Popular Posts

पुणे महानगरपालिकेचा नागरिकांसाठी मोठा दिलासा — मा. महापौर निधीतून आरोग्य उपचारांसाठी विशेष अर्थसहाय्य योजना

पुणे महानगरपालिकेचा नागरिकांसाठी मोठा दिलासा — मा. महापौर निधीतून आरोग्य उपचारांसाठी विशेष अर्थसहाय्य योजना

पुणे : Pune Municipal Corporation तर्फे सुरू करण्यात आलेल्या मा. महापौर निधी अंतर्गत आरोग्यासाठी विशेष अर्थसहाय्य योजना ला शहरभरातून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, नागरिक आरोग्य सहाय्यता कक्ष तर्फे या उपक्रमाचे मनापासून स्वागत करण्यात आले आहे.
नागरिक आरोग्य सहाय्यता कक्षाचे संस्थापक अध्यक्ष समीर शफी पठाण यांनी माननीय महापौर महोदया यांचे विशेष कौतुक करत सांगितले की, “गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी ही योजना अत्यंत दिलासादायक आहे. आम्ही लवकरच माननीय महापौर महोदया यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या योजनेची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.”
तसेच त्यांनी पुढे स्पष्ट केले की, “Pune Municipal Corporation च्या शहरी गरीब योजना आणि महापौर निधी योजना यांचा लाभ रुग्णांना एकत्रितपणे घेता येईल का, तसेच एकाच वेळी दोन्ही योजनांचा फायदा मिळू शकतो का, याबाबत आम्ही सविस्तर मार्गदर्शन घेणार आहोत. या संदर्भातील स्पष्ट माहिती मिळाल्यानंतर ती सर्वसामान्य गरजू रुग्णांपर्यंत पोहोचवण्याचे काम नागरिक आरोग्य सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून प्रभावीपणे केले जाईल.”
या योजनेत किडनी स्टोन, कॅन्सर, हृदयविकार (बायपास), अँजिओप्लास्टी तसेच डोळ्यांच्या गंभीर आजारांवरील शस्त्रक्रियांसाठी आर्थिक सहाय्य देण्यात येत असून, अनेक रुग्णांना याचा मोठा फायदा होणार आहे.
शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत अशा प्रकारची जनहिताची योजना राबवल्याबद्दल नागरिक आरोग्य सहाय्यता कक्षाच्या वतीने तसेच पुणेकरांच्या वतीने माननीय महापौर महोदया यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले आहेत. “निरोगी पुणे, निरोगी महाराष्ट्र” या उद्दिष्टपूर्तीसाठी ही योजना अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे

योजनेअंतर्गत उपलब्ध आर्थिक सहाय्य:किडनी स्टोन (मूत्रपिंडातील खडे) शस्त्रक्रिया – ₹25,000 पर्यंतकॅन्सर उपचार – ₹50,000 पर्यंतहृदयविकार (बायपास) शस्त्रक्रिया – ₹30,000 पर्यंतअँजिओप्लास्टी – ₹15,000 पर्यंतदुधीगळ (रेटिनल डिटॅचमेंट) शस्त्रक्रिया – ₹50,000 पर्यंतही योजना विशेषतः गरीब व गरजू रुग्णांसाठी असून, महागड्या उपचारांचा आर्थिक भार कमी करण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.

आवश्यक कागदपत्रे:भरलेला अर्जपुणे मनपाच्या हद्दीतील कोणताही एक रहिवासी पूरावा आणि उत्पन्नाचा दाखला(तहसीलदारांकडून – ₹3 लाखांपर्यंत)हॉस्पिटलचे उपचार व खर्चाचे अंदाजपत्रकहॉस्पिटल बिल व संबंधित कागदपत्रेमहापालिकेच्या या उपक्रमामुळे गरजू रुग्णांना वेळेवर उपचार मिळण्यास मोठी मदत होणार असून “निरोगी पुणे, निरोगी महाराष्ट्र” घडविण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि इतर गरजूंपर्यंतही ही माहिती पोहोचवावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.