Popular Posts

कोंढवा खुर्द येथे “प्रशासन आपल्या दारी” उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

कोंढवा खुर्द येथे “प्रशासन आपल्या दारी” उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे (प्रतिनिधी): दिनांक २५ एप्रिल २०२६, शनिवार रोजी नागरिक आरोग्य सहायता कक्ष तर्फे कोंढवा खुर्द येथील पारगे नगर परिसरात समीर शफी पठाण यांच्या जनसंपर्क कार्यालयात “प्रशासन आपल्या दारी” या उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.या शिबिरामध्ये परिसरातील मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेत विविध शासकीय योजनांचा लाभ घेतला. यावेळी आधार कार्ड अपडेट, रेशन कार्ड, उत्पन्न दाखला, शहरी गरीब योजना (PMC) तसेच इतर शासकीय सेवांबाबत मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आल्या.

सदर उपक्रम सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू होता. या कालावधीत शेकडो नागरिकांनी उपस्थित राहून आपापल्या कागदपत्रांशी संबंधित अडचणी सोडवून घेतल्या. पुणे शहरात अनेक नागरिकांना विविध शासकीय दस्तऐवजांबाबत अडचणी येत असल्याची दखल घेऊन हा उपक्रम राबविण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.नागरिक आरोग्य सहायता कक्षाचे संस्थापक अध्यक्ष समीर शफी पठाण यांच्या पुढाकारातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे स्थानिक रहिवाशांनी कौतुक केले. नागरिकांना एकाच ठिकाणी विविध सेवा उपलब्ध करून देणारा हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरल्याची प्रतिक्रिया उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.