1
1
पुणे | प्रतिनिधी: भारताच्या आगामी जनगणना २०२७ प्रक्रियेअंतर्गत राज्यात स्वगणनेला सुरुवात झाली असून, पुणे शहरात महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने या उपक्रमाचा औपचारिक प्रारंभ करण्यात आला. दिनांक १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत घर यादी, घरगणना आणि स्वगणना प्रक्रिया राबविण्यात येत आहे.या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिका क्षेत्रातील मान्यवरांनी se.census.gov.in या अधिकृत पोर्टलवर जाऊन स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण केली. या उपक्रमात महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री Sunetra Pawar, केंद्रीय राज्यमंत्री Murlidhar Mohol, राज्यमंत्री Madhuri Misal, तसेच आमदार Siddharth Shirole, Hemant Rasane आणि Yogesh Tilekar यांनी सहभाग नोंदवला.तसेच Pune Municipal Corporation च्या महापौर Manjusha Nagpure, स्थायी समिती अध्यक्ष Shrinath Bhimale, विविध समित्यांचे अध्यक्ष, सदस्य, तसेच अतिरिक्त महापालिका आयुक्त Pavneet Kaur आणि Omprakash Divte यांनीही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला.

डिजिटल जनगणनेवर भरयावेळी नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने स्वगणना करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. डिजिटल माध्यमातून जनगणना प्रक्रिया अधिक पारदर्शक, जलद आणि अचूक होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.नागरिकांना सहभागाचे आवाहनया उपक्रमाच्या निमित्ताने पुणेकरांनी स्वगणना प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. जनगणना ही केवळ माहिती संकलनाची प्रक्रिया नसून भविष्यातील विकास आराखड्यासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.