1
1
मुंबई (प्रतिनिधी): नागरिक आरोग्य सहायता कक्ष, पुणे तर्फे आज मुंबई येथील मंत्रालयातील सार्वजनिक आरोग्य कार्यालयात सन्माननीय आरोग्य राज्यमंत्री मेघना दीदी साकोरे-बोर्डीकर यांची सदिच्छा भेट घेण्यात आली.या प्रसंगी त्यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे शहरात आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराबाबत सविस्तर माहिती सादर करण्यात आली. समाजातील गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना गुणवत्तापूर्ण व मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.यावेळी नागरिक आरोग्य सहायता कक्षाचे संस्थापक अध्यक्ष समीर शफी पठाण म्हणाले, “समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्यसेवा पोहोचवणे ही आमची प्राथमिकता आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मोफत व दर्जेदार उपचार मिळावेत यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. शासनाच्या विविध आरोग्य योजनांचा लाभ प्रत्येक गरजू नागरिकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.”

तसेच, मेघना दीदी साकोरे-बोर्डीकर यांचे आरोग्य क्षेत्रातील योगदान व सर्वसामान्य कार्यकर्त्यांप्रती असलेले त्यांचे आत्मीय नाते अत्यंत प्रेरणादायी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनातून समाजहिताचे अनेक उपक्रम राबविण्यास प्रेरणा मिळत असल्याचेही नमूद करण्यात आले.याच वेळी त्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देत, उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.