Popular Posts

निरोगी महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल — आरोग्य राज्यमंत्री मेघना दीदी साकोरे-बोर्डीकर यांच्यासमोर नागरिक आरोग्य सहायता कक्षाचा वार्षिक अहवाल सादर

निरोगी महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल — आरोग्य राज्यमंत्री मेघना दीदी साकोरे-बोर्डीकर यांच्यासमोर नागरिक आरोग्य सहायता कक्षाचा वार्षिक अहवाल सादर

निरोगी महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल — आरोग्य राज्यमंत्री मेघना दीदी साकोरे-बोर्डीकर यांच्यासमोर नागरिक आरोग्य सहायता कक्षाचा वार्षिक अहवाल सादरमुंबई (प्रतिनिधी): पुणे शहरात मा. आरोग्य राज्यमंत्री मेघना दीदी साकोरे-बोर्डीकर यांच्या प्रेरणेतून सुरू करण्यात आलेल्या नागरिक आरोग्य सहायता कक्षाचा वार्षिक अहवाल आज मुंबई येथील मंत्रालयात त्यांच्या समोर सादर करण्यात आला.या अहवालामध्ये वर्षभरात गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना उच्च दर्जाची आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती देण्यात आली. विशेषतः मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, हृदयविकारांवरील एन्जिओप्लास्टी व इतर शस्त्रक्रिया, प्लास्टिक सर्जरी, ऑर्थोपेडिक ऑपरेशन तसेच विविध जनरल शस्त्रक्रिया शासकीय योजनांच्या माध्यमातून नागरिकांना मोफत व दर्जेदार उपचार उपलब्ध करून देण्यात आल्याचे नमूद करण्यात आले.या कार्याबद्दल मा. मंत्रीमहोदयींनी नागरिक आरोग्य सहायता कक्षाच्या उपक्रमांचे मनापासून कौतुक केले. “समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्याचे हे कार्य अत्यंत मोलाचे असून निरोगी महाराष्ट्र घडवण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच भविष्यातही अधिक जोमाने व प्रभावीपणे काम सुरू ठेवण्याचे मार्गदर्शन त्यांनी केले.

यावेळी नागरिक आरोग्य सहायता कक्षाचे संस्थापक अध्यक्ष समीर शफी पठाण यांच्या कार्याचे विशेष कौतुक करत, “गरजू रुग्णांसाठी केलेले हे कार्य अत्यंत स्तुत्य आहे. पुढील काळातही असेच नेतृत्व घेऊन समाजसेवेचा विस्तार करावा,” असे गौरवोद्गार त्यांनी व्यक्त केले.यावेळी बोलताना समीर शफी पठाण म्हणाले की, “समाजातील प्रत्येक गरजू रुग्णापर्यंत मोफत व गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा पोहोचवणे हा आमचा संकल्प असून, शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून अधिकाधिक नागरिकांना मदत करण्यासाठी आम्ही सातत्याने कार्यरत राहू. निरोगी महाराष्ट्र घडवण्याच्या उद्दिष्टाने आम्ही पुढील काळातही अधिक व्यापक उपक्रम राबविणार आहोत.”या सादरीकरणामुळे समाजातील प्रत्येक गरजू रुग्णापर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्याचा संकल्प अधिक दृढ झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.