1
1
आज Pune Municipal Corporation चे मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेट) श्री. पृथ्वीराज बी. पी. यांनी सेव्हन लव्ह्ज चौक, शंकरशेठ रोड येथे अतिक्रमणासंदर्भात प्रत्यक्ष पाहणी केली.
या पाहणीवेळी मा. सभासद श्री. प्रसन्नजीत वैरागे उपस्थित होते. परिसरातील रस्ते, पदपथ व सार्वजनिक जागांवरील अतिक्रमणाची स्थिती, नागरिकांना होणारी गैरसोय तसेच वाहतुकीवरील परिणाम याचा सविस्तर आढावा घेण्यात आला. संबंधित विभागांना आवश्यक ती तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
महापालिकेकडून शहरातील सार्वजनिक जागा मोकळ्या ठेवणे, पादचारी व वाहनचालकांची सुरक्षितता सुनिश्चित करणे तसेच शिस्तबद्ध शहरी विकास साधणे यासाठी सातत्याने मोहीम राबविण्यात येत आहे.

अतिक्रमणाविरोधातील कारवाई नियमांनुसार व पारदर्शक पद्धतीने करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
नागरिकांनीही सार्वजनिक जागा स्वच्छ व मोकळ्या ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
📱 शहरातील अधिकृत माहिती, शासकीय सेवा व सार्वजनिक उपक्रमांसाठी PMC CARE ॲप डाउनलोड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे https://fxurl.co/PMCCARE