Popular Posts

पुणे महानगरपालिकेत महापौर व उपमहापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीचा आढावा

पुणे महानगरपालिकेत महापौर व उपमहापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीचा आढावा

पुणे महानगरपालिकेत सोमवारी होणाऱ्या महापौर व उपमहापौर निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासनाने व्यापक तयारीला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर मा. श्री. नवल किशोर राम (महापालिका आयुक्त), मा. श्री. पृथ्वीराज बी. पी. (अतिरिक्त महापालिका आयुक्त – ई) तसेच मा. श्रीमती पवनीत कौर (अतिरिक्त महापालिका आयुक्त – ज) यांनी छत्रपती शिवाजी महाराज सभागृहाची प्रत्यक्ष पाहणी करून संपूर्ण व्यवस्थेचा आढावा घेतला.

यावेळी सभागृहातील आसन व्यवस्था, प्रकाशयोजना, ध्वनी व्यवस्था तसेच तांत्रिक सुविधांची सखोल तपासणी करण्यात आली. निवडणूक प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने पार पडावी यासाठी आवश्यक त्या सर्व तयारी पूर्ण करण्यात येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

तसेच मा. महापौर व इतर पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयांचीही पाहणी करून आवश्यक सुधारणा व सुविधा सुनिश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले. प्रशासनाकडून निवडणूक प्रक्रियेसाठी सर्व यंत्रणा सज्ज करण्यात येत असून, शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने निवडणूक पार पाडण्यावर भर देण्यात येत आहे.