1
1
Pune Municipal Corporation (पुणे महानगरपालिका) स्थायी समिती अध्यक्षपदी श्रीनाथ भिमाले यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर त्यांनी आज अधिकृतरित्या पदभार स्वीकारला.
पदभार स्वीकारताना त्यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी तसेच पुणेकरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला. स्थायी समितीमार्फत आर्थिक नियोजन, विकास आराखडे आणि नागरिकाभिमुख निर्णय प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यावर भर दिला जाईल, असे त्यांनी नमूद केले.

यावेळी पुण्याच्या महापौर सौ. Manjusha Deepak Nagpure, उपमहापौर श्री. Parshuram Wadekar, सभागृह नेते श्री. Ganesh Bidkar, भाजपा पुणे शहराध्यक्ष श्री. Dheeraj Ghate तसेच अन्य नगरसेवक उपस्थित होते.
स्थायी समितीच्या माध्यमातून शहरातील पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता व आरोग्य सेवांबाबत अधिक कार्यक्षमतेने निर्णय घेण्यात येतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.