1
1
पुणे महानगरपालिका, समाज विकास विभागामार्फत विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. आगामी जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर विभागामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज आणि पुणे महानगरपालिका, समाज विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने बचत गटातील महिलांसाठी एकदिवसीय मोफत प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले.
दि. २४ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११.०० ते सायं. ०४.०० या वेळेत स्वारगेट येथील मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज यांच्या कार्यालयात हे प्रशिक्षण शिबीर पार पडले.
या शिबिरात औद्योगिक क्षेत्रातील रोजगार, स्वयंरोजगार व व्यवसायाच्या संधी, पॅकेजिंग, मार्केटिंग आदी विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. पुणे महानगरपालिका हद्दीतील बचत गटातील महिलांना उद्योग व्यवसायासाठी प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा उद्देश होता.
या वेळी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या संचालक सारिका दामले, पुणे महानगरपालिकेचे उपसमाज विकास अधिकारी असंग पाटील तसेच राजेंद्र मोरे व संदीप कोळपे (सहाय्यक समाज विकास अधिकारी, समाज विकास विभाग), समुह संघटिका शलाका कांबळे व स्वाती ढगे, NUML चे आण्णा गाडेकर व चंद्रकांत मुळे तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते.
सदर उपक्रमांतर्गत पुणे शहरातील विविध बचत गटांतील एकूण ११५ महिलांना प्रशिक्षण देण्यात आले.
शहरातील अधिकृत माहिती, सरकारी सेवा आणि सार्वजनिक उपक्रमांसाठी PMC CARE ॲप डाउनलोड करण्याचे आवाहन करण्यात आले. https://fxurl.co/PMCCARE