भाजप ओबीसी मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड; आमदार योगेश टिळेकर यांचा पुण्यात सत्कार
Nagrik Express 24x7 | Kondhwa Khurd, Pune | प्रतिनिधी
PUNE
Desk
3/7/20261 min read


Yogesh Tilekar यांची Bharatiya Janata Party च्या ओबीसी मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पुण्यात विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेऊन अभिनंदन व सत्कार केला.
या प्रसंगी नागरिक अधिकार मंचाचे अध्यक्ष समीर शफी पठाण, सामाजिक कार्यकर्ते व भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे सरचिटणीस हाजी इसाक भाई पानसरे, तसेच इमरान जमादार आणि जुनेद शेख उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ नगरसेविका Ranjana Tilekar देखील उपस्थित होत्या.
उपस्थित कार्यकर्त्यांनी आमदार योगेश अण्णा टिळेकर यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थितांनी सांगितले की, आमदार टिळेकर यांनी हडपसर मतदारसंघात विविध विकासकामे राबवून नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे.
रस्ते, पाणीपुरवठा, नागरी सुविधा तसेच शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी परिसराच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.


ओबीसी समाजाच्या प्रश्नांबाबत ते सातत्याने आवाज उठवत असून समाजाच्या प्रगतीसाठी विविध योजना आणि उपक्रम राबविण्याबाबत ते कटिबद्ध असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. त्यांच्या नेतृत्वामुळे ओबीसी समाजाला बळ मिळेल आणि राज्यभरातील कार्यकर्त्यांना नवी दिशा मिळेल, असा विश्वासही उपस्थितांनी व्यक्त केला.
पुणे शहरापुरतेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आमदार योगेश अण्णा टिळेकर यांचे राजकीय व सामाजिक कार्य व्यापक असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांना पुढे आणण्याचे काम ते सातत्याने करत असल्यामुळे अनेक तरुण सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेत असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.
या प्रसंगी उपस्थितांनी आमदार योगेश अण्णा टिळेकर यांना पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
© 2026 Nagrik Express 24x7 | All Rights Reserved | Published on nagrikexpress.com | Pune, Maharashtra
