नागरिकांच्या सोयीसाठी आरोग्य सेवा अधिक जवळ
Nagrik Express 24x7 | Kondhwa Khurd, Pune | प्रतिनिधी
PUNE
Desk
2/7/20261 min read


पुणे महानगरपालिकेचे कार्यक्षेत्र वाढत असताना आरोग्य सेवांचे विकेंद्रीकरण करण्याची गरज दीर्घकाळ जाणवत होती. तब्बल ६–७ वर्षांपासून प्रलंबित असलेली ही मागणी पूर्ण करत महानगरपालिकेने परिमंडळनिहाय सहाय्यक आरोग्य अधिकारी तसेच परिमंडळ आरोग्य अधिकारी (वर्ग–०१) पदांची निर्मिती केली असून सेवाज्येष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
या निर्णयामुळे आरोग्य व्यवस्थापन अधिक सक्षम होण्यास मदत होणार असून नागरिकांना मिळणाऱ्या सेवांची गती आणि गुणवत्ता दोन्ही वाढणार आहेत.
यामुळे –
• नागरिकांना मुख्यालयात येण्याची गरज मोठ्या प्रमाणात कमी होणार
• आरोग्य विषयक कामकाज व पर्यवेक्षण अधिक जलद आणि प्रभावी होणार
• विभागनिहाय कामकाज विकेंद्रित पद्धतीने सुलभ होणार
• स्थानिक स्तरावर आरोग्य सेवा अधिक सक्षमपणे उपलब्ध होणार
महानगरपालिकेचा हा निर्णय नागरिकाभिमुख प्रशासनाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल मानला जात आहे.
© 2026 Nagrik Express 24x7 | All Rights Reserved | Published on nagrikexpress.com | Pune, Maharashtra
