सुरक्षिततेकडे एक पाऊल पुढे – पुणे अग्निशमन दलाची जनजागृती मोहीम अधिक प्रभावी!

Nagrik Express 24x7 | Kondhwa Khurd, Pune | प्रतिनिधी

PMC NEWS

Desk

2/25/20261 min read

पुणे शहरात आग व इतर आपत्कालीन परिस्थितींमध्ये नागरिकांनी सजग आणि सक्षम राहावे यासाठी Pune Fire Brigade मार्फत सातत्याने जनजागृती उपक्रम राबविले जात आहेत. विद्यार्थ्यांपासून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रत्येक घटकापर्यंत सुरक्षा संदेश पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य अग्निशमन विभाग करीत आहे.

याच अनुषंगाने H.V. Desai College येथील वाणिज्य शाखेच्या द्वितीय वर्षातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी अग्निशमन मुख्यालयाला शैक्षणिक भेट दिली.

या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना खालील बाबींची सविस्तर माहिती देण्यात आली:

* आग प्रतिबंधक उपाययोजना

* विविध प्रकारची अग्निशमन यंत्रणा व त्यांचा वापर

* आपत्कालीन परिस्थितीत घ्यावयाची तत्काळ खबरदारी

* प्रत्यक्ष अग्निशमन कार्यप्रणालीचे प्रात्यक्षिक

अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना घर, शाळा, महाविद्यालय तसेच कार्यालयांमध्ये आग टाळण्यासाठी आवश्यक प्राथमिक काळजी, अग्निशामक यंत्र (Fire Extinguisher) योग्य पद्धतीने कसे वापरावे, तसेच आपत्कालीन प्रसंगी घाबरून न जाता शांतपणे आणि शिस्तबद्ध पद्धतीने कसे वागावे याबाबत मार्गदर्शन केले.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षा विषयक जाणीव निर्माण झाली असून, भविष्यात आपत्कालीन परिस्थितीत स्वतःची व इतरांची मदत करण्यासाठी ते अधिक सज्ज होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

📱 महत्त्वाची सूचना:

जवळचे अग्निशमन केंद्र, आपत्कालीन संपर्क क्रमांक तसेच इतर शासकीय सेवा व अधिकृत माहितीसाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा:

👉 https://fxurl.co/PMCCARE�

नागरिकांनी सुरक्षा नियमांचे पालन करून “सुरक्षित पुणे, सजग पुणे” या संकल्पनेला बळ द्यावे, असे आवाहन अग्निशमन दलाकडून करण्यात आले आहे.