पुणे महानगरपालिकेची ‘मिळकतकर अभय योजना’ १५ मार्च २०२६ पर्यंत वाढवली; दंडावर ७५% सवलत
Nagrik Express 24x7 | Kondhwa Khurd, Pune | प्रतिनिधी
PMC NEWS
Desk
2/25/20261 min read


पुणे महानगरपालिकेकडून राबविण्यात येत असलेल्या ‘मिळकतकर अभय योजना’ला नागरिकांकडून मिळत असलेल्या प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर १५ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत थकीत मालमत्ता करावरील दंडाच्या रकमेवर तब्बल ७५ टक्के सवलत दिली जात आहे. त्यामुळे थकबाकीदार मालमत्ता धारकांसाठी ही महत्त्वाची संधी मानली जात आहे.
योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये:
✔️ मुदतवाढ : १५ मार्च २०२६ पर्यंत
✔️ थकीत दंडाच्या रकमेवर ७५% सूट
✔️ निवासी, बिगर निवासी व ओपन प्लॉट मालमत्तांना योजना लागू
✔️ यापूर्वी अभय योजनेचा लाभ घेतलेल्या नागरिकांनाही नव्या योजनेचा लाभ उपलब्ध
महानगरपालिकेच्या आवाहनानुसार, ज्या नागरिकांकडे मालमत्ता कर थकीत आहे त्यांनी वाढीव मुदतीचा लाभ घेऊन कर भरणा करावा.
मालमत्ता कर भरण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध असून नागरिक अधिकृत संकेतस्थळावर जाऊन थेट भरणा करू शकतात:
https://propertytax.punecorporation.org
महानगरपालिकेने थकीत कर लवकरात लवकर भरण्याचे आवाहन केले असून, दंडातील सवलतीचा लाभ घेण्यासाठी १५ मार्च २०२६ पूर्वीच कर भरणा करणे आवश्यक आहे.
© 2026 Nagrik Express 24x7 | All Rights Reserved | Published on nagrikexpress.com | Pune, Maharashtra
