डॉ. सोहेल खान यांच्या पुढाकाराने सना हॉस्पिटलमध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधीची सुविधा सुरू
Nagrik Express 24x7 | Kondhwa Khurd, Pune | प्रतिनिधी
PUNE
Desk
2/24/20261 min read


गरजू रुग्णांसाठी शस्त्रक्रियेला आर्थिक आधार; कोंढवा खुर्द परिसराला दिलासा
पुणे शहरातील कोंढवा खुर्द येथील सना हॉस्पिटलमध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधी (Chief Minister’s Relief Fund) अंतर्गत शस्त्रक्रिया सहाय्य सुविधा अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे. राज्य शासनामार्फत सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येणाऱ्या या योजनेचा लाभ आता या रुग्णालयातही उपलब्ध होणार आहे.
सना हॉस्पिटलचे संचालक डॉ. सोहेल खान (एमबीबीएस, ऑर्थोपेडिक) यांच्या पुढाकाराने ही सुविधा सुरू करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली. या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी आर्थिक सहाय्य मिळणार आहे.
डॉ. खान यांनी सांगितले की,
“मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत सर्जरी सुविधा सुरू झाल्याने परिसरातील पात्र रुग्णांना मोठा दिलासा मिळेल. शासनाच्या नियमांनुसार आवश्यक कागदपत्रांच्या आधारे मदत उपलब्ध करून दिली जाईल.”


राज्यभर ही योजना सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावीपणे राबविली जात आहे. पात्र लाभार्थ्यांना उपचारासाठी आर्थिक सहाय्य सुलभ करण्यावर शासनाचा भर आहे. कोंढवा खुर्द परिसरातील नागरिकांनाही या सुविधेचा थेट लाभ मिळणार आहे.
या प्रक्रियेत नागरिक आरोग्य सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून अर्ज प्रक्रिया, कागदपत्रे व शासकीय मार्गदर्शनाबाबत मदत केली जात असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते समीर शफी पठाण यांनी दिली.
परिसरातील नागरिकांना आवश्यक शस्त्रक्रिया असल्यास संबंधित योजनेचा लाभ घेण्यासाठी सना हॉस्पिटलशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोंढवा खुर्द परिसरात आरोग्यसेवा अधिक सुलभ करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे स्थानिक स्तरावर सांगण्यात आले.
© 2026 Nagrik Express 24x7 | All Rights Reserved | Published on nagrikexpress.com | Pune, Maharashtra
